महात्मा फुले बँकेची सुरुवात दिनांक 10 मार्च 2000 बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. मा. श्री. दादासाहेब उर्फ विनायकराव कोरडे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), यांचे प्रेरणेने झाली व सध्यास्थितीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. दिलीपराव लोखंडे व उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोदराव कोरडे तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असून बँकेला विविध स्तरातून पुरस्कार प्राप्त झाले आहे. बँकेला सतत अंकेशन वर्ग ‘अ’मिळत आहे. बँकेच्या सद्यस्थितीत मुख्य शाखा अमरावती, अचलपूर, वरूड, चांदुर बाजार, मोर्शी आणि यवतमाळ येथे शाखा सुरळीत सुरु आहेत. तसेच इतर जिल्हातसुद्धा लवकरच बँकेच्या शाखा सुरु होतील. बँकेचे सर्व भागधारक सभासद व ग्राहक यांचे सहकार्यामुळे बँकेची प्रगती होत असून असेच सहकार्य नवीन शाखेकरिता मिळत राहील हीच अपेक्षा.